/

Thursday, January 24, 2019

मा.आ. रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या प्रयत्नाला यश...


शासनाच्या आदिवासी विभागाने १४ जानेवारी रोजी काढलेले हे परिपत्रक हे कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी वेळो वेळी पडताळणी समितीच्या कार्यपद्धती बाबत जो आक्षेप घेतला होता त्याची फलसृती आहे. हे केवळ रमेशदादा च्या पाठपुरावा व प्रयत्न यांनी शक्य झाले आहे ..त्याबद्दल मा रमेशदादा पाटील साहेब यांचे हार्दिक आभार..!! ही नव नियुक्त समिती जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी वर अभ्यास करून उपाय योजना सुचवण्यासाठी नेमण्यात आलेली आहे समितीचा कार्यकाळ 1 महिन्याचा असून लवकर त्याबाबत शासन निर्णय देणार आहे gr मधील समितीच्या कार्यकक्षा मध्ये क्रमांक 5 वर कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी इ जमातीच्या व्यक्ती आणि समूहाकडून हि दिलेले अर्ज निवेदने विचारात घेण्यात येतील असे सांगितले आहे...आता आपल्या समाजातील तज्ञांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक सर्वंकष लाभ होईल असे ठोस निवेदने या सामिती कडे द्यावीत..बाकी आ रमेशदादा पाटील हे समाजहितासाठी पाठपुरावा करणार च आहेत यश मिळवून देणार आहेत.. कोळी बांधवावर अनुसूचित जमाती पडताळणी समितीच्या माध्यमातून होणारा अन्याय दूर करण्याबाबतमा.आ. रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या वतीने कुठलाही बडेजाव न करता सातत्याने सुरु असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून मा.मुख्यमंत्री महोदयांनी आ. रामेशदादांना सांगितल्याप्रमाणे पडताळणी समितीच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून त्याचा शासन निर्णय देखील आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या समितीत समाजातील तज्ञ व्यक्तींना स्थान देण्यात येणार आहे, व सदर निर्णयात कोळी महादेव,कोळी मल्हार, टोकरे कोळी जनतेनी सादर केलेली निवेदन विचारात घ्यावीत असे स्पष्ट पणे नमूद केले आहे, हीच मा. आ. रमेशदादा पाटलांनी केलेल्या कार्याची व दिलेला शब्द पाळल्याची पावती आहे. समाजाच्या वतीने मा. आ. रमेशदादा पाटिल याचे हार्दिक अभिनंदन....सतीश धडे-संपादक-मासिक कोळी समाज संदेश.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...