/

Tuesday, January 22, 2019

कोळी समाजाचे प्रश्न हे फडणवीस सरकारच सोडवेल: सोलापूर येथील समाज मेळाव्यात आ.रमेशदादा पाटील यांचे प्रतिपादन ...


कोळी समाजाचे प्रश्न हे फडणवीस सरकारच सोडवेल: सोलापूर येथील समाज मेळाव्यात आ.रमेशदादा पाटील यांचे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमेशदादा पाटील यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचा सोलापूर येथे सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधताना त्यांनी वरील विधान केले यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वाला अनुसरून सर्व समाजांच्या हिताचे कार्य करीत असल्याची भावना व्यक्त केली. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या आमदार रामेशदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. युती सरकारच्या काळात मागील २० वर्षांपासून प्रलंबित असलेले कोळी समाजाचे अनेक प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोडविले असल्याचे त्यांनी उपस्थीतांना सांगितले. मराठा आरक्षणावर भाष्य करताना त्यांनी या समजाच्या उत्कर्षासाठी सरकारने केलेल्या आर्थिक-शैक्षणिक लाभांच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. या सरकारने मराठा समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी आरक्षण सोडून आरक्षणाच्या चारपट मागण्या मान्य केलेल्या आहेत. तरुणांना सत्तर हजार नोकऱ्या उपलब्ध करून देतानाच उद्योग-व्यवसाय करण्यासाठी किमान दहा लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले आहे. हे सांगतांच त्यांनी ह्या सर्व सुविधा एससी व एसटीच्या लोकांना मिळाल्यास त्यांचीही चांगली प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र कोळी महासंघाचे संयोजक श्री. अरुण कोळी व संजय कोळी, कोळी महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. अरुण लोणारी, भाजपा शहराध्यक्ष अशोक निम्बर्गी तसेच अनेक कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...