
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने दि. १४ जानेवारी २०१९ रोजी काढलेले हे परिपत्रक हे कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी वेळो वेळी पडताळणी समितीच्या कार्यपद्धती बाबत जो आक्षेप घेतला होता त्याची फलसृती आहे.हे केवळ रमेशदादा च्या पाठपुरावा व प्रयत्न यांनी शक्य झाले आहे ..त्याबद्दल मा रमेशदादा पाटील साहेब यांचे हार्दिक आभार..!! ही नव नियुक्त समिती जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी वर अभ्यास करून उपाय योजना सुचवण्यासाठी नेमण्यात आलेली आहे समितीचा कार्यकाळ 1 महिन्याचा असून लवकर त्याबाबत शासन निर्णय देणार आहे gr मधील समितीच्या कार्यकक्षा मध्ये क्रमांक 5 वर कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी इ जमातीच्या व्यक्ती आणि समूहाकडून हि दिलेले अर्ज निवेदने विचारात घेण्यात येतील असे सांगितले आहे...आता आपल्या समाजातील तज्ञांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक सर्वंकष लाभ होईल असे ठोस निवेदने या सामिती कडे द्यावीत..बाकी आ रमेशदादा पाटील हे समाजहितासाठी पाठपुरावा करणार च आहेत यश मिळवून देणार आहेत.. असो भेद मतभेद विसरा उगाच काड्या करणं टीका करणं बँड करून या उच्च न्यायालयानचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेत निर्माण झालेल्या समितीकडे आपले म्हणणे योग्य पुरावयासह देण्याकडे सगळे जण लक्ष द्या... व आपल्या बाजूनें निर्णय घेण्यास सरकार ला भाग पाडू या..!!
धन्यवाद सतीश धडे..
No comments:
Post a Comment